Narendra Modi : नरेंद्र मोदी यांच्या बैठकीला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार? राजेश टोपे आढावा मांडणार

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या वतीने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे कोरोनाच्या राज्यातील परिस्थितीचा आढावा मांडणार असल्याचं कळतंय.

देशात कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 27 टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 2 लाख 47 हजार 417 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत आहेत.  कोविड-19 च्या स्थितीवर चर्चा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या वतीने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे कोरोनाच्या राज्यातील परिस्थितीचा आढावा मांडणार असल्याचं कळतंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI