Narendra Modi | नरेंद्र मोदींचा रोममध्ये नागपूरच्या योगा प्रशिक्षकाशी मराठीतून संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांची एका मराठी माणसाशी भेट झाली आणि मोदींनी त्यांच्याशी चक्क मराठीतून संवाद साधला. या व्यक्तीचं नाव आणि व्यवसाय विचारण्यापासून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूसही केली. भर गर्दीतच मोदींनी हा संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 परिषदेसाठी इटलीच्या रोममध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी येथील कार्यक्रमांना हजेरी लावली. पियाझा गांधी परिसरात त्यांनी अनेक भारतीयांची भेट घेतली. या गर्दीत त्यांनी नागपूरचे महेंद्र शिरसाट ऊर्फ माही गुरुजींची भेट झाली. प्रचंड गर्दीतून चालणंही मुश्किल होत असताना मोदींनी या माही गुरुजींशी चक्क मराठीतून संवाद साधला.माही गुरुजी गेल्या 22 वर्षांपासून इटलीमध्ये भारतीय योग आणि अध्यात्माचा प्रचार-प्रसार करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI