‘सत्य हे सत्यचं असतं! तुम्ही जर मर्द असाल तर…’, शिवसेना नेत्यानं दिलं थेट खुलं आव्हान
VIDEO | ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिलेला मारहाण केल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनं आव्हान देत केला हल्लाबोल
ठाणे : ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी संध्याकाळी मारहाण झाली. आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच रशमी ठाकरे यांनी भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच काल नेमकं काय घडलं, हे जाणून घेतलं. याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले, चुकीच्या पद्धतीने शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांवर आरोप करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. रोशनी शिंदे या गरोदर महिलेला मारहाण केल्याचा कांगावा केला होता. तिच्या जीवाला काही झालं तर त्याला जबाबदार मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे सहकारी असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप यांच्या विरोधात अतिशय घाणेरड्या भाषेत ती महिला व्यक्त आक्षेपार्ह पद्धतीने होत असते. त्या महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून मातोश्री आणि खासदार राजन विचारे हे आमच्या नेत्यांवर टीका करत असतात, असा आरोप करत महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कशाला बदनामी करता. मर्द आहात अशा घोषणा करतात. मर्द असाल तर तुम्ही रस्त्यावर या. अशी कृत्य करू नका. असा इशाराही नरेश म्हस्के यांनी दिला.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

