Nashik Ganesh Visarjan 2021 | नाशिकमध्ये मानाच्या चांदीच्या गणपतीचं विसर्जन

आज अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनाचा दिवस आहे. दहा दिवस गणेशाची मनोभावे पूजा-अर्जना केल्यानंतर आज भक्त साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.

आज अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनाचा दिवस आहे. दहा दिवस गणेशाची मनोभावे पूजा-अर्जना केल्यानंतर आज भक्त साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही मानाच्या चांदीच्या गणपतीचं विसर्जन साध्या पद्धतीनं पार पडलं.

यावेळी मंदिर परिसरातच एका कृत्रिम तलावात बाप्पाचा विसर्जन करण्यात आलं. यावेळी अभिनेता चिन्मय उद्गगीरच्या हस्ते बाप्पाला उपस्थितांनी भावपूर्ण असा निरोप दिला. यावेळी ‘गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या अशा आवाजाने परिसर दुमदमुन गेला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI