फरार निदा खान अजूनही आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटोमुळे खळबळ
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकरणात रोज नवी आणि थक्क करणारी माहिती समोर येत आहे. अलीकडेच प्रकरणातील तपासात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. फरार आरोपी निदा खान हिने नोकरी सोडल्यानंतरही इतर आरोपींसोबत संपर्क कायम ठेवला होता.
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकरणात रोज नवी आणि थक्क करणारी माहिती समोर येत आहे. अलीकडेच प्रकरणातील तपासात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. फरार आरोपी निदा खान हिने नोकरी सोडल्यानंतरही इतर आरोपींसोबत संपर्क कायम ठेवला होता. कॉल डिटेल रेकॉर्डनुसार ती सातत्याने संवाद साधत होती, त्यामुळे मोठ्या कटाचा संशय व्यक्त केला जात आहे.
दुसरा आरोपी दानिश शेख याच्या मोबाईल तपासात SIT ला महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळाले आहेत. मोबाईलमध्ये संशयास्पद फोटो आणि व्हिडिओ आढळले असून त्यांचे सखोल तपास सुरू आहे. या पुराव्यांतून आणखी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या SIT सर्व तांत्रिक पुरावे जोडण्याचे काम करत आहे. दरम्यान, आरोपी आणि फरार निदा खान यांच्या जामीन अर्जावर 27 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत पोलिसांकडून ठोस पुरावे सादर होण्याची शक्यता आहे.
Published on: Apr 26, 2026 02:50 PM
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द

