नाशकात शिंदे गटाला धक्का; पालिकेत असं काय झालं? की न्यायालयालाच का द्यावा लागला आदेश
नाशिकमध्ये शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यात वाद सुरू होता. तर गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात या दालनाचा ताबा घेण्यावरून ठाकरे गट आणि शिवसेना आमने-सामने आले होते. यात तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांच्या आदेशाने पोलिसांनी हे कार्यालय सिल केले होते.
नाशिक : येथील महानगर पालिकेच्या कर्मचारी सेनेचे दालन ताब्यात घेण्यावरून नाशिकमध्ये शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यात वाद सुरू होता. तर गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात या दालनाचा ताबा घेण्यावरून ठाकरे गट आणि शिवसेना आमने-सामने आले होते. यात तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांच्या आदेशाने पोलिसांनी हे कार्यालय सिल केले होते. याच्याविरोधात कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आज शिंदे गटाला धक्का देणारा निकाल आला आहे. काल झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने पोलिसांना सिल काढण्याचे आदेश दिले असून, दालनाचा ताबा ठाकरे गटाकडे देण्याचा निर्णय दिलाय. त्यामुळे या दालनाचा ताबा ठाकरे गटाकडे अर्थात या म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष असलेले ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडे जाणार आहे. या निर्णयाने ठाकरे गटाने शिवसेनेला धक्का दिल्याची चर्चा सुरू झालीय.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?

