अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण; पहाटेच्या शपथविधी उपस्थित आमदाराची आता भूमिका काय?
MLA Nitin Pawar on Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीवेळी उपस्थित असणाऱ्या आमदाराची आता भूमिका काय? पाहा सविस्तर प्रतिक्रिया...
नाशिक : सध्या राज्याच्या राजकारणात एकाच गोष्टीची चर्चा आहे. ती म्हणजे अजित पवार भाजपमध्ये जाणार का? याची. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. 2019 ला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथ घेतली. तेव्हा अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार नितीन पवार यांनी या सगळ्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. “अजितदादांबाबत आम्ही फक्त मिडियातूनच चर्चा ऐकत आहोत. पण मी अजितदादांचा खंदा समर्थक आहे. 2019 साली देखील पहाटेच्या शपथविधीला देखील मी हजर होतो. जर दादांनी काही निर्णय घेतला तरी नाशिक जिल्ह्याचे आमदार त्यांच्यासोबत असणार आहेत. मोठ्या प्रमाणात आमदार दादांच्या संपर्कात आहेत. जिथे अजितदादा तिथे नितीन पवार!, हे निश्चित आहे, असंही नितीन पवार यांनी म्हटलं आहे.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण

