सूर्य जरा जास्त कोपला!; महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील दुर्घटनेवर सामनातून भाष्य
Saamana Editorial On Maharashtra Bhushan Award : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात 13 श्री सेवकांचा मृत्यू; सामनातून सरकारवर टीकास्त्र. पाहा व्हीडिओ...
मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्या दरम्यान उष्माघातामुळे 13 श्री सेवकांचा मृत्यू झाला. त्यावर आजच्या सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. “खारघर येथे झालेला 13 श्री सेवकांचा मृत्यू सरकारी बेफिकिरी व राजकीय लोभामुळे झाला. त्याचे प्रायश्चित्त कोणी घ्यायचे ? अप्पासाहेबांना दिलेल्या ‘ महाराष्ट्रभूषण ‘ मुळे जो आनंद झाला , त्यास गालबोट लावण्याचे काम मुख्यमंत्री व त्यांच्या अति फाजील टोळीने केले . 13 श्री सेवकांचा बळी घेणे हे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्य़ात बसते . मुख्यमंत्री अयोध्येत जाऊन आले . तेथून संयम शिकले नाहीत व अप्पासाहेबांकडून मानवता शिकले नाहीत . अर्थात या मंडळींनी ज्यांना गुरू मानले आहे , त्या गुरूंचाही मानवतेशी संबंध नाही . मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे , असे अप्पासाहेबांनी तळमळीने सांगितले , पण मानवतेच्या बाबतीत उदासीनता दाखविणारे मंचावर होते . सूर्य त्यामुळेच जास्त कोपला असावा!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

