MNS Candidate : मारहाण करत लुटलं अन् केली जबरी चोरी, विधानसभेच्या तोंडावर मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल

MNS Candidate : मारहाण करत लुटलं अन् केली जबरी चोरी, विधानसभेच्या तोंडावर मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल

| Updated on: Nov 10, 2024 | 2:27 PM

नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये मनसेच्या एका उमेदवारावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सचिवाला मारहाण करत लुटल्याची तक्रार दाखल झाली आहे.

नाशिक पूर्वचे उमेदवार प्रसाद सानप यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे कार्यालयीन सचिव योगेश पाटील यांच्या तक्रारीनंतर नाशिक पूर्वचे उमेदवार प्रसाद सानप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात घुसून चोरी केल्याचा आरोप प्रसाद सानप यांच्यावर योगेश पाटील यांनी केला आहे. तर निवडणूक खर्चाची रक्कम योगेश पाटील यांनी वापरली नाही, असा आरोप प्रसाद सानप यांनी केलाय. हेच पैसे परत मागण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी गेलेल्या प्रसाद सानप आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चोरी केल्याचा आरोप करण्यात आलाय. योगेश पाटील यांच्या घरात घुसून त्यांच्या घरातून 8 लाख 84 हजार रुपये रोख चोरल्याचा आरोप केला गेला आहे. एकूण 9 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची तक्रार योगेश पाटील यांनी केली आहे. याच तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी प्रसाद सानप यांच्यासह त्यांच्या जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Published on: Nov 10, 2024 02:27 PM