रस्ते की मृत्यूचा सापळा? नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांचा चौथा बळी, अखेर स्थानिकांनी…
नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आणखी एका नागरिकाचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. एक्सलो पॉईंट परिसरात निलेश कोतकर यांचा खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून खड्ड्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा पालिका प्रशासनावर टीका होत आहे.

यापूर्वीही रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत अशा घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांकडून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन येथे पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्यात आले.
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर विशेष महासभा न घेता टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप सत्ताधाऱ्यांवर करण्यात आला. खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव जात असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
Published on: Jul 30, 2026 03:42 PM
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..