Nashik Ramtekdi Tree Felling: कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीवर कुऱ्हाड, झाडं तोडून लपवली?
नाशिकमधील रामटेकडी परिसरात तपोवनाजवळ सुमारे ३०० ते १४०० झाडे तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वृक्षतोडीनंतर झाडांचे बुंदे मातीखाली लपवल्याचा आरोप स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमी करत आहेत. महापालिका कुंभमेळ्यासाठी जलमल शुद्धीकरण केंद्राचे कारण देत असली, तरी नागरिक यावर तीव्र संताप व्यक्त करत आहेत आणि यामागे मोठ्या भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त होत आहे.
नाशिकमधील रामटेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचे समोर आले आहे. तपोवनापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागात सुमारे ३०० झाडांची कत्तल करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, तोडलेल्या झाडांचे बुंदे मातीखाली दाबून पुरावा लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमी करत आहेत. नाशिक महानगरपालिका कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जलमल शुद्धीकरण केंद्र (STP) उभारण्यासाठी ही झाडे तोडल्याचे सांगत आहे. पालिकेकडे ४४७ झाडे तोडण्याची परवानगी असल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षपणे १२०० ते १४०० झाडे तोडल्याचा संशय पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे नाशिककरांमध्ये तीव्र संताप असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही वृक्षतोड पैसे आणि पैशासाठी चाललेली लूट असल्याचे आरोप केले जात आहेत.
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?
काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं

