AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratan Tata Passed Away : टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास, जाणून घ्या अल्पपरिचय

Ratan Tata Passed Away : टाटा समुहाचं ‘रत्न’ हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास, जाणून घ्या अल्पपरिचय

| Edited By: | Updated on: Oct 10, 2024 | 12:43 PM
Share

रतन टाटा यांना प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटांच्या निधनाने केवळ उद्योगजगतासह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा हे कालवश झाले आहेत. रतन टाटा यांचे बुधवारी (९ऑक्टोबर) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. भारताच्या उद्योगक्षेत्रातील अग्रणी आणि आदराचं नाव काळाच्या पडद्या आड गेलं आहे. देशभरातून राजकीय नेत्यांसह इतर मान्यवरांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला होता. १९७१ मध्ये रतन टाटा समुहातील नेल्को कंपनीची धुरा सांभाळली. रतन टाटा हे टाटा समुहाचे माजी अध्यक्ष होते. १९९० ते २०१२ या काळात रतन टाटांच्या खाद्यांवर टाटा समुहाची धुरा होती. जेआरडींकडून रतन टाटांची उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती. अध्यक्षपदावर असताना रतन टाटांनी समुहासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. भारत सरकारकडून रतन टाटा यांना २००० मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता. तर २००८ मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारने देखील रतन टाटांचा सन्मान करण्यात आला होता.

Published on: Oct 10, 2024 10:15 AM