अजित पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्याची जयंत पाटील यांच्याकडून पाठराखन
राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची पाठराखन केली आहे. तर राज्यातील सरकारची स्थिती ही स्थिर असताना, ती नाही असं म्हणणं कितपत योग्य आहे. दादांनी तेच केलं
नागपूर : राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकार हे स्थिर असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काहीच ठीक नसल्याचे समोर येत असून एक वाक्यता नसल्याचे उघड होत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांची पाठराखन केली आहे. तर राज्यातील सरकारची स्थिती ही स्थिर असताना, ती नाही असं म्हणणं कितपत योग्य आहे. दादांनी तेच केलं. आता त्यांच्याकडे 150 पेक्षा जास्त आमदार असतील तर असं म्हणणं योग्य आहे. आता सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर काय होईल हे त्यावेळी बघू. तर खरं बोललं तरी शिक्षा या राज्यात होते असा टोला लगावला आहे.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

