ऐकावं ते नवलंच ! 110 फूट उंच वटवृक्षाच्या शेंड्यावर बसून ‘त्यानं’ केलं नवनाथांचं पारायण
VIDEO | सहा वर्षांपूर्वी विहीरीत उतरून ध्यानधारणा केल्यानंतर आता 110 फूट उंच वटवृक्षाच्या शेंड्यावर बसून 'त्यानं' केलं पारायण, बघा कुठं घडला हा प्रकार
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एका महाराजांनी चक्क ११० फूट उंचीच्या वटवृक्षाच्या शेंडयावर बसून पारायण सुरू केल्याचे समोर आहे आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देसवंडी गावात संजय महाराज शिरसाठ यांनी महाशिवरात्रीपासून१० दिवसांचे हे पारायण सुरू केलं आहे. २८ फेब्रुवारी रोजी सोमेश्वर देवस्थान येथे या पारायणाची सांगता होणार आहे. तर कोणतंही ऊन, वारा, थंडीची पर्वा न करता सुरू असलेल्या संजय महाराज शिरसाठ यांच्या या पारायणाची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे. संजय शिरसाठ महाराज यांनी गेल्या सहा वर्षांपूर्वी विहीरीत उतरून ध्यानधारणा केली होती त्यावेळी देखील संजय महाराज शिरसाठ चांगलेच चर्चेत आले होते.
Published on: Feb 20, 2023 05:13 PM
Latest Videos
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

