4 मुलं जन्माला घाला… ‘ओवैसींना पाकमध्ये पाठवावं नवनीत राणांची मागणी’
तुम्ही जास्त सल्ला देऊ नका, 'भारत माता कि जय' बोला, 'वंदे मातरम' बोला आणि इस्लामला मागे ठेवून संविधानाला पुढे ठेवा असं ओपन चॅलेंज नवनीत राणांनी ओवैसींना केलंय.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर खासदार असदुद्दीन ओवैसी आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यात चांगलीच जुंपली आहे. चार मुलं जन्माला घालायला तुम्हाला कोण रोखतंय, मी तर सहा मुलं जन्माला घातली आहेत यावर, जास्त सल्ला देऊ नका, ओवैसींना पाकिस्तानात पाठवून द्यावं असं वक्तव्य करत नवनीत राणा चांगल्याच पेटल्या आहेत.
तुम्ही जास्त सल्ला देऊ नका, ‘भारत माता कि जय’ बोला, ‘वंदे मातरम’ बोला आणि इस्लामला मागे ठेवून संविधानाला पुढे ठेवा असं ओपन चॅलेंज नवनीत राणांनी ओवैसींना केलंय. ज्यांना आठ – दहा मुलं जन्माला घालायची आहेत अशा लोकांना देशातुन काढून त्यांची सिटिझनशिप काढून त्यांच्या पक्षाची परवानगी रद्द करून पाकिस्तानात पाठवून द्या अशा मागण्या नवनीत राणांनी केल्या आहेत. पाकिस्तानी जशे भीक मागतात तसचं ओवैसींना भीक मागण्यासाठी पाठवून द्यावं असं खळबळ जनक वक्तव्य करत राणांनी ओवैसींच्या विधानाला चोप उत्तर दिलयं
नांदेडमध्ये शिंदे गटात खळबळ; आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक
देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्...
छ. शिवाजी महाराजही पाटीदार.... भाजप मंत्र्याच्या विधानानं राजकीय वादंग
काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचारानं नागपूरमध्ये तुफान चर्चा

