Nawab Malik | एनसीबीच्या माध्यमातून पैसे उकळण्याचं काम, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज (20 ऑक्टोबर) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर निशाणा साधला. खरंतर एनडीपीसी कोर्टाने आज अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्ज फेटाळला. आर्यन सह त्याचे अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज (20 ऑक्टोबर) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर निशाणा साधला. खरंतर एनडीपीसी कोर्टाने आज अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्ज फेटाळला. आर्यन सह त्याचे अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीवर सडकून टीका केली. आर्यन खानची केस ही फेक आहे. तसेच एनसीबीने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवायांपैकी 90 टक्के कारवाया फेक आहेत. लोकांमध्ये दहशत आणि खंडणी मागण्यासाठी या कारवाया केल्या जात असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI