प्रभाकर साईलच्या आरोपांवर साक्षीदारांसह समीर वानखेडेंचीही साक्ष नोंदवणार: NCB अधिकारी ज्ञानेश्वर सिंह

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Oct 27, 2021 | 3:28 PM

प्रभाकर साईल यांच्या 25 कोटींच्या आरोपासंदर्भात समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवला जाईल,  असं एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रकरणातील प्रत्येक साक्षीदाराला चौकशीसाठी बोलावलं जाईल, असं ज्ञानेश्वर सिहं म्हणाले याशिवाय प्रत्येक गोष्ट सांगता येणार नाही, असं देखील ते म्हणाले.

मुबई : क्रुझवरील ड्रग्ज रेड प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यानं के. पी.गोसावी आणि समीर वानखे़डे यांच्यावर आरोप केले होते. समीर वानखेडे यांनी कोऱ्या कागदावर सही घेण्यात आली असं प्रभाकर साईल यानं म्हटलं होत. प्रभाकर साईल यांच्या 25 कोटींच्या आरोपासंदर्भात समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवला जाईल,  असं एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रकरणातील प्रत्येक साक्षीदाराला चौकशीसाठी बोलावलं जाईल, असं ज्ञानेश्वर सिहं म्हणाले याशिवाय प्रत्येक गोष्ट सांगता येणार नाही, असं देखील ते म्हणाले.

Follow us

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI