नवाब मलिक वेटिंगवर…राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत नावच नाही, अजितदादा तिकीट देणार की नाही?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी त्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय बंगल्यावर आपल्या पक्षाच्या विद्यमान आमदारांना बोलावलं होतं. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी आपल्या आमदारांना विधानसभा निवडणुकीसाठी एबी फॉर्म दिल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार गट राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत 38 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तर यामध्ये बारामतीतून स्वतः अजित पवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत तर याचबरोबर मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, दिलीप मोहिते पाटील यांना देखील पक्षाकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहेत. तर अजित पवार गट राष्ट्रवादीकडून जाहीर कऱण्यात आलेल्या यादीत मुंबईमधून कोणालाच उमेदवारी देण्यात आली नसल्याचे पाहायला मिळत आहे. या यादीमध्ये सर्व दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली मात्र नवाब मलिकांचे नाव राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वेटिंगवर ठेवण्यात आलेल्या नवाब मलिकांना अजित पवार गट राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, भाजपचा नवाब मलिकांना उमेदवारी देण्यास विरोध असताना अजित पवार कोणता निर्णय घेता याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

