साहेब दैवतच पण सोबत असणाऱ्या चाकणकर यांचा इशारा म्हणाल्या, ‘बोलल तर…’
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचा आज मुंबईतील एमईटी येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे मेळावा पार पडला. यावेळी नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या मनातील खदखदही बोलून दाखवली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि आज अजित पवार यांच्यासोबत गेले अनेक नेते व्यासपीठावरच आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचा आज मुंबईतील एमईटी येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे मेळावा पार पडला. यावेळी नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या मनातील खदखदही बोलून दाखवली. तसेच त्यांनी शरद पवार यांच्या गटात असणाऱ्या नेत्यांना इशारा दिला. त्यांनी महाराष्ट्रामध्ये जी ओळख आपल्याला दिली ती दिली ती पक्षाने आणि शरद पवार यांनी. त्यामुळे साहेब दैवत आहेत. त्याच्यामुळे साहेबांच्या विरोधातली कोणतीच भूमिका नाही. आम्ही साहेबांचा आशीर्वाद घेऊन, शाहू फुले आंबेडकरांचा वचन आणि विचार घेऊन या ठिकाणी उपस्थित आहोत. पण त्याचा अर्थ असा नाही की साहेबांच्या सोबत जे आहेत त्यांच्या विरोधात नाही. आमचा हा विचार आहे, तो विचार हा कोणाच्या विरोधात नाही. कोणाच्या संघर्षात नाही, कोणाच्या वरती टीका करण्यासारखी नाही. पण तुम्ही आम्हाला बोलायला लावलं तर आमच्याही शब्दाला तलवारीची धार आहे असही त्या म्हणाल्या.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

