‘अजित पवार यांना आपण मुख्यमंत्री करुनच राहू’, ‘या’ नेत्यानं बांधला चंग
VIDEO | भावी मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू, अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजे म्हणत कुणी केलं अजितदादांचं कौतुक?
नाशिक : राजकीय नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून पोस्टरबाजी सुरु असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केले आहे. तर अजित पवार यांना आपण मुख्यमंत्री करुनच राहू, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे चंगच बांधल्याचे दिसतंय. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. नरहरी झिरवळ यांनी अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वाविषयी अनेक गुणही सांगितले. अजित पवार यांच्या स्वभावाविषयी बोलताना नरहरी झिरवळ यांनी सांगितले की,’फणसाच्या अंगी काटे, आत अमृताचे साठे’ अशी उपमा देत अजित पवार यांचे झिरवळ यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या कामामुळेच आता अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याबाबत बोलताना सांगितले की, मी मुख्यमंत्री यांच्याकडे जात नाही, तर तेच माझ्याकडे येतात आणि त्यांनाच माझ्याकडे यावं लागतं असा टोलाही झिरवळ यांनी यावेळी लगावला आहे.
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी

