Amol Mitkari Video : अमोल मिटकरींचा नाव न घेता राणेंना टोला, शिवरायांच्या 19 मुस्लिम सरदारांची यादीच केली ट्विट; म्हणाले…
गेल्या दोन दिवसांपूर्वी मुस्लिमांवरून आणखी एक वक्तव्य करून नितेश राणे यांनी वाद ओढवून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते. स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती असं वक्तव्य राणे यांनी केलंय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते. स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती असं वक्तव्य राणे यांनी केलंय. दरम्यान, नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर वाद सध्या वाद पेटलाय. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी राणे यांचे कान टोचले. त्यांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्ती करत, जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य कोणीही करून नये, असे म्हणत चांगतलेच फटकारल्याचे पाहायला मिळाले. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादीच ट्वीट केली आहे. नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर १९ मुस्लीम सरदारांची यादी मिटकरींनी ट्वीट केली. नितेश राणे यांचं नाव न घेत मिटकरींनी शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिम सरदार, अधिकारी, सैनिकांच्या नावाची यादीच ट्विट केली आहे. ‘मंत्री महोदयांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचला पाहिजे. शिवाजी महाराजांचं स्वराज्य केवळ हिंदूंच राज्य नव्हतं. ते केवळ मुस्लीम विरोधी राष्ट्र नव्हतं. ते १८ पगड जाती आणि ते १२ बलुतेदारांचं स्वराज्य होतं.’, असं अमोल मिटकरींनी सांगतं नितेश राणेंना खोचक टोला लगावला आहे.