हलाल vs झटका, ‘घ्यायचं तिथून मटण घेईन…’, राणे अन् आव्हाडांमध्ये जुंपली; अधिवेशनात मटणावरून राजकीय वाद
निलेश राणेंनी मटणासाठी आता मल्हार सर्टिफिकेशनच्या दुकानांची संकल्पना आणली आहे आणि हिंदूंनी हिंदूंच्याच दुकानातून मटण खरेदी करावी, असं आव्हान केलं. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी वाटेल तिथून खरेदी करणार कोण रक्त बघतो या शब्दात चॅलेंज दिलंय.
हलाल विरुद्ध झटका मटण मंत्री नितेश राणे यांनी आता मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून झटका मटण दुकाने उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्यामुळे आता अधिवेशनात मटणावरून राजकीय वाद पेटला आहे. मला घ्यायचं तिथून मटण घेईन, कोण अडवतो ते बघतो असं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी दिलंय.
मल्हार सर्टिफिकेशन किंवा झटका मटण म्हणजे काय?
मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून हिंदूंची मटण चिकनची दुकाने उघडली जातील. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम च्या माध्यमातून हिंदू समाजातील खाटिक वर्गांना प्रमाणपत्र मिळणार आहेत. मटण विकणारा हिंदूच असेल आणि मटणात भेसळ नसेल असा दावा आहे. तसेच हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून उघडलेल्या दुकानातून मटण खरेदी करावी असं आव्हान नितेश राणे यांनी केला आहे. मटण, चिकन हिंदूंच्याच दुकानातून खरेदी करण्यासाठी नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशनचा प्लॅटफॉर्म समोर आणला आहे तर दुसरीकडे मुस्लिमांवरून आणखी एका वक्तव्याने नितेश राणे यांनी वाद ओढवून घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते. स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती असं वक्तव्य राणे यांनी केलंय. ‘हिंदू धर्माला नष्ट करण्याचे षपथ ज्या औरंगजेबाने घेतलेली त्या औरंगजेबाला थांबवण्याचा आणि आव्हान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आमच्या संभाजी महाराजांनीच केलं आहे. स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकलायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे’, असं नितेश राणे म्हणाले.

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?

एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
