Nitesh Rane Video : राज ठाकरेंच्या कुंभस्नानावरील ‘त्या’ वक्तव्यावरून नितेश राणे भडकले, ‘एवढीच हिंमत असेल तर….’
कुंभमेळा संपला असला तरी राज ठाकरेंच्या विधानांनी नव्या राजकीय वादाचा कुंभ सुरु झालेलं आहे. कुंभमेळ्यामधून आणलेल्या गंगाजलावर बोलताना राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणावर टीका केली. यानंतर भाजपचे नेते आक्रमक झालेत
कुंभमेळ्यामधून आणलेल्या गंगाजलावर बोलताना राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणावर टीका केली. गंगेतल्या प्रदूषणाबद्दल आसूड ओढत राज ठाकरेंनी नाव न घेता भाजपच्या गंगा स्वच्छतेच्या मोहिमेवरचं सवाल केला. अरे हाड.. असं म्हणत त्यांनी बाळा नांदगावकरांनी आणलेलं गंगाजल प्राशन करण्यासही नकार दिला. यावरूनच भाजपच्या नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. ‘ईदच्या काळात बकऱ्या कापून घाण पाणी सोडलं जातं तेव्हा कोणी काही बोलत नाही. रमजान ईदच्या नावाखाली मोहम्मद अली रोड यासरख्या भागात जाऊन बघा.. रात्री सगळं खाऊन-पिऊन घाण रस्त्यावर टाकतात तेव्हा त्यांना कोणी जाब विचारत नाहीत. सगळे प्रश्न फक्त हिंदू समाजालाच विचारणार?’, असा सवाल करत नितेश राणे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. एवढीच हिम्मत आहे तर बकरी ईद आणि रमजान ईदच्या वेळी विचारा ना…मोहरम या सणाच्या वेळी प्राण्यांमध्ये सळई भोसकल्या जातात, तेव्हा कोणी बोलत नाहीत, प्रश्न करत नाहीत, असे म्हणत नितेश राणे राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरून भडकले. पुढे ते असेही म्हणाले, हिंदू धर्म आणि समाजाच्या अस्थेबद्दल कोणीही प्रश्न विचारू नये आणि जर विचारायचे असतील तर अन्य धर्मांना देखील सवाल विचारण्याची हिम्मत दाखवावी.

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
