Laxman Hake : झाकणझुल्या ते YZ… हाके अन् सूरज चव्हाण आमने-सामने, बघा काय घडलं tv9 मराठीवरील चर्चेत?
'सरकार एका समाजासाठी नाही तर सर्व समाज घटकासाठी काम करतं', असं सूरच चव्हाण यांनी म्हटलं असून ओबीसी नेके लक्ष्मण हाकेंच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलंय.
अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात सातत्याने शाब्दिक युद्ध होत असल्याचे पाहायला मिळतंय. लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आक्रमक झाले. अशातच लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत माफी मागावी अशी मागणी देखील केली. तर दुसरीकडे महाज्योतीला कमी निधी गेला आणि अजित पवारांकडून सारथीला ४५० कोटींचा निधी गेला, असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी आरोप केला. यानतंर आज पुन्हा लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण हे टीव्ही ९ मराठीवर लाईव्ह होते.
यावेळी पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. सर्वात पहिले लक्ष्मण हाके यांनी अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीवर टीका केली. यावेळी त्यांच्याकडून गोचीड असा शब्द प्रयोग करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याकडून सांगितले जात आहे. तर मला झाकणझुल्या आणि YZ असा शब्दप्रयोग कुणी केला? असा प्रतिसवाल लक्ष्मण हाकेंनी केला.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

