शरद पवारांचे वारसदार कोण? अजितदादा मिश्कीलपणे म्हणाले, ‘मी रतन टाटांचा वारससदार…’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी अजित पवार यांची मुलाखत दिली. यावेळी अजित पवारांना शरद पवार यांचे वारसदार कोण? असा थेट सवाल केला असता दादा म्हणाले....
राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन गट पडले आहेत. यानंतर अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचं घड्याळ हे पक्षचिन्ह आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने सुपूर्द केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह शरद पवार यांचं अपत्य असल्याचं भाष्य नुकतंच एका राजकीय प्रचारसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं होतं. दरम्यान, आज अजित पवारांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी अजित पवारांना वारसदारावरून एक सवाल करण्यात आला. यावर अजित पवारांनी थेट उत्तर दिलं. अजित पवार स्वतःला शरद पवारांचे वारसदार मानतात का? असा सवाल ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी अजित पवारांना केला असता अजित पवार म्हणाले, ‘आपण कोणी काहीही मानून चालत नाही. जनतेच्या मनात काय आहे? ते महत्त्वाचं असतं. उद्या मी रतन टाटांचा वारसदार स्वतःला मानेन…त्याला काय उपयोग आहे’, असं म्हणत मिश्कील वक्तव्य केलं. बघा अजित पवार पुढे नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार

