अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात नाक खुपसू नये कारण…, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
VIDEO | अमित शाह यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा गौरव केला असला तरी त्यांनी वाचलेली स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांचीच... राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अकोला : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुणे आणि कोल्हापूर दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे देशाला छत्रपती शिवाजी महाराज माहिती पडले असे भाष्य केले. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली. तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. अमित शाह यांनी वाचलेली स्क्रिप्ट ही देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिल्याची टीकाही अमोल मिटकरी यांनी केली आहे. अमित शहा तुम्ही गुजरातचे आहात तर गुजरातमध्ये रहा, महाराष्ट्राच्या इतिहासमध्ये नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही महाराष्ट्रात कशासाठी आला होतात का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
Published on: Feb 20, 2023 11:11 PM
Latest Videos
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

