Nilesh Lanke : काहींना लई घाई झालीये, जेव्हा आपण हाफ चड्डीत… राष्ट्रवादीच्या मेळाव्यात लंकेंची फटकेबाजी
काहींना खूप घाई झाली आहे, असं वक्तव्य निलेश लंके यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चांवर निलेश लंके यांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे.
‘जरा धीर धरा, काहींना खूप घाई झाली आहे. आहे ना नेता.. आपलं वय नाही तेवढा नेत्याचा अनुभव आहे. आपण अंड्यात आहोत. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपला नेता देशाच्या राजकारणात होता.’, असं निलेश लंके म्हणाले. इतकंच नाहीतर पुढे ते असेही म्हणाले, साहेब तुम्हाला कळाले तर लोटांगण घालेन. हे समजलं नाही म्हणून तर देशाच्या राजकारणात ५५ वर्ष टिकून राहिलेला नेता आहे. हे सोप्प नाही. सगळी गणितं समजून घ्यावी, साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाहीतर आज्ञाधारक विद्यार्थी म्हणून काम करावं, असंही मिश्कीलपणे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन १० जून रोजी पुण्यात साजरा होतोय. या कार्यक्रमात निलेश लंके यांनी हे वक्तव्य केलंय.
वर्धापन दिनानिमित्त होत असलेला मेळावा हा आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने शक्तिप्रदर्शनच ठरत आहे. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित आहेत.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी

इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला

वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...

राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
