संसद भवनाची कोणती इमारत अधिक प्रिय, जुनी की नवी?; सुप्रिया सुळे यांनी सांगितलं…

VIDEO | संसद भवनाची कोणती इमारत अधिक प्रिय? सुप्रिया सुळे म्हणाल्या, '...माझं भावनिक नातं'

संसद भवनाची कोणती इमारत अधिक प्रिय, जुनी की नवी?; सुप्रिया सुळे यांनी सांगितलं...
| Updated on: May 28, 2023 | 1:54 PM

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथील नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. आज सकाळी सर्व धर्मीयांच्या प्रथा परंपरांप्रमाणे पूजा करण्यात आली. यानंतर सेंगोलची स्थापना करण्यात मोदींच्या हस्ते झाली. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांना संसदेची कोणती इमारत तुम्हाला अधिक प्रिय आहे? असा सवाल करण्यात आला. याप्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, ‘जुनी वास्तू मला प्रिय आहे. त्या भिंती बोलक्या आहेत. कारण मोठमोठ्या लोकांनी इथंच बसून काम केलं आहे. देशाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय याच संसदेत घेण्यात आले आहेत. या जुन्या इमारतीशी माझं भावनिक नातं आहे.’, असे त्यांनी म्हटलं पुण्यात माध्यमांशी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी आजच्या सोहळ्याला विरोधकांनी घातलेल्या बहिष्कारावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, देशाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा हा दिवस आहे. विरोधीपक्ष जर नसेल तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना बोलवायला हवं होतं. लोकशाहीचे मंदिर माझ्यासाठी जुनी बिल्डिंग आहे. लोकसभेच्या अध्यक्षांना बोलावलं गेलं मग राज्यसभेच्या सभापतींना का बोलावलं नाही? असंही त्या म्हणाल्यात.

 

 

Follow us
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.