Jitendra Awhad : ‘आपण काय पेरलं आणि काय उगवतं हे डोळे उघडून बघा’; आव्हाड यांची कोणावर टीका
जयपूर-मुंबई पॅसेंजर रेल्वे मुंबईला येत असताना आरपीएफ कॉन्स्टेबलने अंधाधूंद गोळीबार केला. यात एका आरपीएफ कॉन्स्टेबलसह चौघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
ठाणे, 01 ऑगस्ट 2023 | सोमवारी संपूर्ण मुंबईसह देशाला हादरवून टाकणारी घटना घडली. जयपूर-मुंबई पॅसेंजर रेल्वे मुंबईला येत असताना आरपीएफ कॉन्स्टेबलने अंधाधूंद गोळीबार केला. यात एका आरपीएफ कॉन्स्टेबलसह चौघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली होती. तर अटक केलेल्या आरोपी कॉन्स्टेबल चेतनच्या चौकशीत अनेक धक्का दायक बाबी उघड झाल्या. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आव्हाड यांनी या देशातील विद्वेशाचे राजकारण काय थराला गेले आहे याचं हे उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. तर मारले ते कोण होते जो इन्स्पेक्टर होता तो मागासवर्गीय दलीत समाजाचा होता. जे तीन जन मारले गेले ते अल्पसंख्याक होते. तर आरोपी चेतनचे संभाषण वृत्तपत्रात, टीव्ही आणि रिल्समध्ये आलेलं आहे. ते संभाषण ऐकल्यानंतर आपला जीव घाबरायला सुरुवात होते असंही म्हटलं आहे. तर आपण काय पेरल आहे आणि काय उगवत आहे हे देखिल डोळे उघडून बघा असा सल्ला त्यांनी लोकांना दिला आहे. तर हा देश देश ठेवायचा नाही, या देशाच्या विघटनाला कशी सुरुवात होईल असाच प्रयत्न केला जात असल्याची टीका देखील यावेळी त्यांनी केली आहे.
Published on: Aug 01, 2023 09:40 AM
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
