टिव्हीवर दिसण्यासाठी गोपीचंद पडळकर यांचं आंदोलन, रोहित पवारांची खोचक टीका

हर्षदा शिनकर, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 31, 2023 | 12:57 PM

एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलनात सहभागी झालेल्या भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर रोहित पवार यांचा निशाणा, काय केली टीका?

मुंबई : यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी परीक्षा घेण्याचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावेळी आंदोलन करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडले. याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षात होते, त्यामुळे गोपीचंद पडळकरांना वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याची सवय आहे. व्यक्तिगत हित न पाहता केवळ आपण टिव्हीवर यावं, यासाठी आंदोलन न करता विद्यार्थ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन त्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं असल्याचे म्हणत रोहित पवार यांनी खोचक टीकाही पडळकरांवर केली आहे. बच्चू कडू यांनी ज्या-ज्या कारणांसाठी आंदोलन केले. ते विषय या सरकारमध्ये घेतले जात नाही तर ते विषय दुर्लक्ष केले जात आहे. महत्त्वाच्या विषयात हे सरकार सकारात्मक नसेल आणि जरी बच्चू कडू त्या सरकारमध्ये पदासाठी गेले असले तरी ऑरिजनल बच्चू कडू हे तेथे अस्वस्थ राहणारच, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI