NCP Sangram Jagtap : दो दिन के अंदर खत्म… अजितदादांचे आमदार संग्राम जगतापांच्या जीवाला धोका, कोणी दिली धमकी?
नगर शहराचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वासंदर्भातील भूमिका आणि वक्तव्यांमुळे अजित पवार गट राष्ट्रवादीचे आमदार जगताप चर्चेत आहेत. संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानंतर पक्षामधूनच त्यांना विरोध केला जातोय. संग्राम जगतापांनी पक्षाच्या विचारधारेशी फारकत घेतलीची टीका राजकीय वर्तुळातून होत असताना आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याधमकी प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजमध्ये “संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा” असा थेट जीवे मारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हम करे सो कायदा हे.. ; निलेश लंके सरकारवर संतापले

राड्यानंतर राहुल नर्वेकरांचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर

ना हनी, ना ट्रॅप..; हनीट्रॅपवर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

सगळे आमदार माजले... फडणवीसांनी भर सभागृहात कोणाला फटकारलं?
