मिळालेल्या धमकीनंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,’मी धमकीची चिंता…’
VIDEO | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, त्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांना जीवे मारण्याची ही धमकी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी धमकीची चिंता करत नाही, धमक्यांना घाबरत नाही. ज्यांच्याकडे जबाबदारीची ही सूत्रं आहेत, त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही,’ असे शरद पवार म्हणाले. तर कोणत्याही घटनेवर मत मांडण्याचा देशाच्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. आणि धमक्या देऊन जर कोणाचा आवाज बंद करू शकेल असे कोणाला जर वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आपल्या धमकीची चिंता नाही, आपला राज्यातील पोलीसांवर विश्वास आहे असे शरद पवार यांनी असेही म्हटले.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

