Sharad Pawar | दिल्ली दौरा आटोपून शरद पवार मुंबईकडे रवाना
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्ली दौरा आटोपून मुंबई कडे रवाना झाले आहेत. शरद पवार दिल्लीत पोहोचल्यापासून चर्चेच्या केंद्रस्थानी होते.
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्ली दौरा आटोपून मुंबई कडे रवाना झाले आहेत. शरद पवार दिल्लीत पोहोचल्यापासून चर्चेच्या केंद्रस्थानी होते. शरद पवारांच्या दिल्ली दौऱ्यात राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर हे त्यांच्या भेटीला पोहोचले होते. शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेविषयी चर्चा होणार असल्याची बातम्या झाल्या होत्या. मात्र, भाजप विरोधासाठी बैठक घेण्यात आली नव्हती असं राष्ट्रमंचच्या नेत्यांनी सांगितलं होतं.
Latest Videos
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!

