Sunanda Pawar : रोहित पवारांच्या आईकडून गुंड घायवळचं तोंडभरून कौतुक; जुना व्हिडीओ समोर येताच खळबळ!
रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवारांचा गुंड निलेश घायवळसोबतचा एक जुना व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुनंदा पवार कोविड काळात शाळेला मदत केल्याबद्दल घायवळचे आभार मानताना दिसत आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचा गुंड निलेश घायवळसोबतचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुनंदा पवार, निलेश घायवळने कोविड-19 महामारीच्या काळात एका शाळेला केलेल्या मदतीबद्दल त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ कोविड काळातील असून, तो आता सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे.
व्हिडीओमध्ये सुनंदा पवार म्हणतात की, “निलेश भाऊंचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही ही खूप गरजेची गोष्ट या शाळेला तुम्ही दिलीत. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.” घायवळच्या या कृतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. अनेक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा जुना व्हिडीओ व्हायरल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची नावे चर्चेत असताना, हा व्हिडीओ राजकीय वर्तुळात लक्ष वेधून घेत आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

