शरद पवार लालबागच्या राजाच्या दरबारी, नात अन् जावयासोबत बाप्पाच्या चरणी लीन
मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेला बाप्पा म्हणजे लालबागचा राजा... नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागच्या राजाचं दर्शन व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक राज्यभरातून तर काही परदेशातूनही येत असतात.
यंदाही राजकारणी मंडळी लालबागच्या राजाच्या दर्शनाला दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. आज सकाळी शरद पवारांनी लालबागच्या राजाच्या दरबारी दाखल होत त्यांनी दर्शन घेतलं. लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी पवार कुटुंबातील लोकंही त्यांच्यासोबत हजर होते. शरद पवार यांनी त्यांची नात आणि जावयासह लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याचे पाहायला मिळाले. जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासोबत शरद पवार लालबागच्या राजाच्या दरबारात गेले होते. तर शरद पवार जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी यंदा शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

