‘शरद पवार यांना ‘या’ वयात वणवण फिरायला लावतायत’; भाजप नेत्याची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
येवला हा छगन भूजबळ यांचा बालेकिल्ला असून त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली. ते अजित पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले. त्यावरून शरद पवार यांनी येवल्यात सभा घेत सरकारमध्ये जाणाऱ्या आणि राष्ट्रवादीत फूट पाडणाऱ्यांचा समाचार घेतला.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी फुटीनंतर राज्याच्या दौरा करत आहेत. त्यांनी या वयात म्हणणाऱ्यांना इशारा देत राष्ट्रवादीच्या बांधणीचा चंग बांधला आहे. याचदरम्यान त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरूवात नाशिकमधून केली. येवला हा छगन भूजबळ यांचा बालेकिल्ला असून त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली. ते अजित पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले. त्यावरून शरद पवार यांनी येवल्यात सभा घेत सरकारमध्ये जाणाऱ्या आणि राष्ट्रवादीत फूट पाडणाऱ्यांचा समाचार घेतला. मात्र यावरूनच आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केलीये. या वयात आपल्या नेतृत्व आणि अट्टहासासाठी हे लोक त्यांना वणवण फिरायला लावतायत असा टोला त्यांनी लगावलाय. तर उद्धव ठाकरेंचे आमदार फुटले तेव्हा त्यांनी संवाद यात्रा काढली त्याला काय प्रतिसाद मिळाला हे आपण सर्वांनी पहिल्याच त्यांनी म्हटलंय. तर पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची या वयात धरपड सुरू आहे. मात्र त्यांनी असे न करता राष्ट्रवादीच्या बळकटिसाठी अजित पवार यांना आशीर्वाद देऊन भूमिका घ्यायला पाहिजे होती, असा सल्ला दरेकर यांनी दिलाय. तसेच राष्ट्रवादीचे सर्व नेते हे अजित पवारांच्या मागे असल्याचेही ते म्हणालेत.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?

