Jayant Patil : सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
Assembly Session Chaos : विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्यावरून आज गदारोळ झाला. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील हे लक्षवेधीच्या संख्येवरून संतापलेले दिसले.
विधिमंडळाच्या अधिवेशनात आज 3 हून अधिक लक्षवेधी मांडण्याच्या मुद्यावरून गदारोळ झाला. सभागृहाचे नियम पाळले जात नाहीत. कामकाज नीट होत नाही, या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हा मुद्दा उपस्थित केला. तसंच जयंत पाटील यांनी यासंबंधीचा कामकाजाचा नियमच वाचून दाखवला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आज डिमांडवर चर्चा आहे. 4 विषयांची चर्चा होणार आहे. त्यानंतर 4 प्रस्ताव आपण क्लब केलेत. त्यावर चर्चा करण्यास सर्व सदस्य उत्सुक आहेत. विधानसभा कामकाजाच्या नियमानुसार एका दिवशी केवळ 3 लक्षवेधी घेता येतात. प्रत्येक लक्षवेधीला 10 मिनिटांचा वेळ दिला जातो. पण आज आपण 35 लक्षवेधी घेतल्या. सदस्यांना न्याय देणं ठीक आहे. पण सभागृहाची ऐसी तैसी करायला लागलो आहे आपण, अशा शब्दात जयंत पाटील यांनी संपूर्ण प्रकरणावर टीका केली आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

