‘मर्दाची औलाद असते तर…’, जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांसंदर्भात बोलताना जीभ घसरली
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांसंदर्भात एक आक्षेपार्ह विधान केलंय. मुंब्र्यातील एका सभेत बोलताना त्यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेनंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुंब्र्यातील एका सभेत अजित पवारांसंदर्भात बोलताना जीभ घसरली आहे. मर्दाची औलाद असते तर वेगळ्या चिन्हावर लढले असते, असं आक्षेपार्ह वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. दरम्यान, यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही सडेतोड उत्तर देण्यात आलंय. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी समर्थन दिलंय. आव्हाड बोलले ते योग्यच असल्याचे म्हणज अंबादास दानवे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याला दुजोराच दिलाय. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या अजित पवारांवरील टीकेनंतर भाजप देखील मैदानात उतरली आहे. भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर शाब्दित हल्ला चढवत चांगलाच समाचार घेतला. जितेंद्रे आव्हाड यांनी मुंब्र्यातील सभेत बोलताना केवळ अजित पवार यांच्यावरच नाहीतर आरएसएसवरही निशाणा साधला. देशातील शांतता बिघडवणारे नथूरामांची औलाद असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर चंद्रशेखऱ बावनकुळेंनी देखील चोख प्रत्युत्तर दिलंय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

