शेतकऱ्यांच्या हिताचं काय केलं पाहिजे ते त्यांनी आवश्यक सांगावं; पवारांच्या टिकेवर शिंदेच्या मंत्र्याचा पलटवार
शरद पवार यांचा नेहमी सल्ला आम्ही सर्वजण घेत असतो. ते एक ज्येष्ठ राजकारणी आहेत. त्यांनी महाराष्ट्राची खूप चांगली सेवा केलेली आहे. पण अशी टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हिताचं काय केलं पाहिजे हे त्यांनी आवश्यक सांगावं असे ते म्हणाले
अयोध्या : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्यातील मुळ प्रश्नांना बगल देण्यासाठी राम आणि अयोध्येचा नारा दिला जातो असे म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पलटवार केला. त्यांनी, शरद पवार यांचा नेहमी सल्ला आम्ही सर्वजण घेत असतो. ते एक ज्येष्ठ राजकारणी आहेत. त्यांनी महाराष्ट्राची खूप चांगली सेवा केलेली आहे. पण अशी टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हिताचं काय केलं पाहिजे हे त्यांनी आवश्यक सांगावं असे ते म्हणाले. जसं शेतीमध्ये महाराष्ट्र अग्रगण्य आहे तसा बागायतीमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे पहिल्यांदाच एक मोठा कार्यक्रम राबवण्यात येतोय. ज्यामुळे राज्यातील एकही फळ फुकट जाणार नाही. महाराष्ट्रातली जवळ जवळ 70% तालुके हे या कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

