Vijaykumar Ghadge : छाती-पोटात बुक्के, बोलायला त्रास, माझा जीव जाईल पण…सूरज चव्हाणांकडून मारहाण, घाडगेंनी सांगितलं घडलं काय?
लातूरमध्ये चव्हाण यांच्याकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. सुनील तटकरे समोर पत्ते फेकल्यानंतर ही मारहाणीची घटना घडली आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये गुंडाप्रमाणे सुरज चव्हाण मारहाण करतायत. पाठीत बुक्के मारतायत. याचवेळी त्यांच्यासोबतचे सहकारी देखील मारहाण करताना दिसतायत
सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची गुंडगिरी पाहायला मिळाली. छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंना बेदम मारहाण करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्याकडून लातूरमध्ये विजयकुमार घाडगेंना चांगलीच मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या लातूरमध्येच उपचार सुरू आहे. पोटात त्रास होतोय, बोलायलाही त्रास होतोय अशी प्रतिक्रिया सध्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या घाडगे यांनी दिली आहे.
लातूरमध्ये असलेले सुनील तटकरे यांच्या दौऱ्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते त्यांच्यासमोर टाकले होते आणि त्यानंतर सूरज चव्हाणांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली तर विधानभवनाच्या सभागृहामध्ये माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याने छावा संघटनेने आंदोलन केलं होतं. दरम्यान, सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्यानंतर सुनील तटकरे यांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. सुनील तटकरे लातूरहून तात्काळ मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती देखील आता मिळतेय.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन

