Supriya Sule Video : CIDच्या आरोपपत्रातून कराडचं नाव समोर येताच सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, ‘महाराष्ट्राची बदनामी ‘या’ दोन लोकांमुळेच…’
वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची माहिती CID ने दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आली आहे. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला.
वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची माहिती CID ने दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आली आहे. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला. ‘दोन लोकांनीच राज्याची बदनामी केली आहे. बीड आणि परळीचे लोक साधे आणि सरळ सुसंस्कृत आहेत. पण दोन लोकांच्या गलिच्छ राजकारणामुळे राज्याची वाट लावली आहे. राज्याची बदनामी केली आहे’, असा दावा करत सुप्रिया सुळे यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर निशाणा साधला. तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली. 70-75 दिवस झाले तरी कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे. तो सापडत का नाही? मग राज्यात नसेल तर परराज्यात आहे का? यांनी दिल्लीशी संपर्क साधला का? केंद्रीय गृहमंत्रालयाशी संपर्क साधला का? एक सातवा खूनी 70-75 दिवस फरार कसा असू शकतो? सरकारला प्रश्न पडत नाही? असे अनेक सवाल सुप्रिया सुळेंनी यावेळी केलेत. पुढे त्या असेही म्हणाल्या, बीडमधील कोणती केस राहिलीय. खून, भ्रष्टाचार, खंडणी, पीक विम्यात फसवणूक, हार्वेस्टरमध्ये घोटाळा, डोमेस्टिक व्हायलन्स… आता कोणता गुन्हा राहिलाय? असं म्हणत सुप्रिया सुळे आक्रमक झाल्यात. तर मी कधीच खोटेनाटे आरोप करत नाही. आवादा नावाच्या कंपनीने तक्रार केली तेव्हाच या हैवानांना आवरले असते तर वैभवीचे वडील गेले नसते, असं म्हणत त्यांनी सरपंचांच्या हत्या प्रकरणावर खंत व्यक्त केली.

'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्

लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक

देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल

शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'
