तेव्हा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; सुनील तटकरे यांचं साकडं
२००४ साली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता पण तसं होऊ दिलं नाही. पृथ्वीराज चव्हाण २०१० साली मुख्यमंत्री झाले आणि बदल झाला असं मोठं वक्तव्य अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी केलं. परंतु तसं होऊ दिलं नाही. ते का नाही होऊ दिलं? याचं स्पष्टीकरण अजित दादा तुम्ही आता द्यायला हवं, असं साकडंच तटकरे यांनी अजितदादांना घातलं
कर्जत, ३० नोव्हेंबर २०२३ : २००४ साली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता पण तसं होऊ दिलं नाही. पृथ्वीराज चव्हाण २०१० साली मुख्यमंत्री झाले आणि बदल झाला असं मोठं वक्तव्य अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी केलं. यासह तटकरे असेही म्हणाले की, अजित पवार यांच्यावर २००९ नंतर टीका सुरू झाली, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांची बाजू घ्यायला हवी होती, अशी खंतही सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. तर २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री झाला असता. परंतु तसं होऊ दिलं नाही. ते का नाही होऊ दिलं? याचं स्पष्टीकरण अजित दादा तुम्ही आता द्यायला हवं, असं साकडंच तटकरे यांनी अजितदादांना घातलं. कर्जत येथे राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू असताना त्यामध्ये सुनील तटकरे हे बोलत होते.
Published on: Nov 30, 2023 01:59 PM
Latest Videos