AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neelam Gorhe Video : मर्सिडीज vs टायरवाल्या काकू... साहित्यिकांचा मेळा...मर्सिडीज कारनं बनला राजकीय आखाडा

Neelam Gorhe Video : मर्सिडीज vs टायरवाल्या काकू… साहित्यिकांचा मेळा…मर्सिडीज कारनं बनला राजकीय आखाडा

| Updated on: Feb 24, 2025 | 10:34 AM
Share

दोन मर्सिडीज द्या आणि एक पद घ्या अशी कार्यपद्धती ठाकरेंच्या शिवसेनेत सुरू असल्याचा सनसनाटी आरोप शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला आहे आणि वास्तविक मंच साहित्य संमेलनाचा होता. त्यामुळे दिल्लीमधील या संमेलनाची सांगता झाली खरी. पण गोऱ्हे यांच्या आरोपांनी नवं राजकीय बिगुल सुरू झालाय.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय शेरेबाजी करत नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय. शिवसेनेत दोन मर्सिडीज कार दिल्यावर एक पद मिळायचं, असा खळबळजनक दावा नीलम गोऱ्हे यांनी केलाय. त्यावर जर हे खरं असेल तर शिवसेनेमध्ये चार वेळा आमदार पद मिळवणाऱ्या गोऱ्हे यांनी ठाकरेंना आठ मर्सिडीज दिल्याच्या पावत्या घेऊन याव्यात असं आवाहन संजय राऊतांनी दिलंय. दरम्यान, गोऱ्हे विरोधात पुण्यामध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या. फोटोवर टायरवाल्या काकू असं लिहित गोरे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि गोऱ्हे यांच्या घरात देखील शिरून आंदोलनाचा प्रयत्न झाला. आरोपांवर मर्सिडीजच्या पावत्या दाखवाव्यात या राऊतांच्या आवाहननंतर नीलम गोऱ्हे यांची भूमिका मात्र दाव्यावरून लोकं असं सांगतात इथपर्यंत आलीये. चार आमदारकीच्या हिशोबाने तुम्ही ठाकरेंना आठ मर्सिडीज दिल्या का? यावर माझ्याकडून कधीही पैसे घेतले नसल्याचं गोऱ्हे यांनी सांगितलंय. दुसरीकेडे नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेने किती पदं दिली. याचाही उल्लेख करत ठाकरे गटाने आरोप सिद्ध करण्याचं आव्हान गोऱ्हेंना दिलंय. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून गोऱ्हे यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यावर काही लोक गैरफायदा घेत आहेत अशी प्रतिक्रिया आयोजक संजय नहार यांनी दिली आहे. तर दुसरीकडे संजय राऊतांनी जर साहित्यिकांच्या मंचावरून राजकारणच होणार असेल तर आमची ही बाजू का ऐकली नाही अशा शब्दात नाराजी दर्शवली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 24, 2025 10:34 AM