‘साहित्य संमेलनात ५० लाख अन् मर्सिडीज देऊन सहभागी?’, गोऱ्हेंबद्दल राऊतांचा दावा, थेट संमेलनाध्यक्षांना खरमरीत पत्र
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. यावरूनच संजय राऊत यांनी संमेलन अध्यक्षा उषा तांबेना खरमरीत पत्र लिहिले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (९८वे) दिल्लीत सुरू आहे. या संमेलनाच्या “असे घडलो आम्ही” या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. यावरूनच संजय राऊत यांनी संमेलन अध्यक्षा उषा तांबेना खरमरीत पत्र लिहिले आहे. संमेलनाच्या चर्चा-परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला, असल्याचे राऊतांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे. दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
तर दिनांक २३ फेब्रुवारी रोजी ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय व सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी, असे राऊतांनी या पत्राद्वारे म्हटले आहे. तर नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, “मी महामंडळाच्या सदस्यांना ५० लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले व उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले.” हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

