AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी; 4 वर्षांचा हादरवून टाकणारा प्लॅन समोर!

मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी; 4 वर्षांचा हादरवून टाकणारा प्लॅन समोर!

| Updated on: May 20, 2026 | 3:50 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणातील आणखी एक संवेदनशील अपडेट समोर आली आहे. NEET घोटाळ्यात आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. पुण्याहून अटक करण्यात आलेला प्रा. पी. व्ही. कुलकर्णी गेल्या चार ते पाच वर्षांपासून एनटीएचा पेपर सेटर होता अशी माहिती समोर आली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणातील आणखी एक संवेदनशील अपडेट समोर आली आहे. NEET घोटाळ्यात आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. पुण्याहून अटक करण्यात आलेला प्रा. पी. व्ही. कुलकर्णी गेल्या चार ते पाच वर्षांपासून एनटीएचा पेपर सेटर होता अशी माहिती समोर आली आहे. त्याची सुरुवात विषय तज्ज्ञ म्हणून झाली आणि नंतर तो वेटिंग टीमपर्यंत पोहोचला असं सांगितलं जात आहे. तज्ज्ञ त्यांच्या विषयाचे प्रश्न तयार करतात, ज्यातून पेपरचे पाच सेट बनतात. वेटिंग टीम अंतिम दोन सेट निश्चित करते, जे प्रिंट होतात. पेपरचा मराठी अनुवादही कुलकर्णीच करत होता. साधारणपणे एक तज्ज्ञ एकच काम करतो, त्याला ही दोन्ही कामे कुणी दिली, याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनटीए मध्ये त्यांचं आणखी कोणासोबत कनेक्शन होतं का, तिथे आणखी कोणी मदत करत होते का? याचा तपास देखील सुरू आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, मोटेगावकरच्याच कार्यालायात  व्ही. पी. कुलकर्णी २०२२ मध्ये कामाला होता. सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार चार वर्षांपासून पासून त्यांचा हा प्लॅन सुरू होता. समोर आलेल्या माहितीनुसार मोटेगावकरानेच खूप मेहनत घेऊन कुलकर्णीची NTA समितीवर वर्णी लावून दिली होती.

Published on: May 20, 2026 03:50 PM
Follow Us