NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा तो व्हिडीओ व्हायरल, पाहा
सध्या देशात नीट पेपरफुटी प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकमध्ये सापडले. त्यानंतर आता लातूर देखील रडारवर असल्याचे समोर आले आहे. लातूर येथील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’ (RCC)चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर (वय ४७) यांना नीट युजी (NEET UG) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातून अटक केली आहे.
सध्या देशात नीट पेपरफुटी प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकमध्ये सापडले. त्यानंतर आता लातूर देखील रडारवर असल्याचे समोर आले आहे. लातूर येथील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’ (RCC)चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर (वय ४७) यांना नीट युजी (NEET UG) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातून अटक केली आहे. रविवार, 17 मे 2026 रोजी सायंकाळी 7:15 वाजता ही धडक कारवाई करण्यात आली. या अटकेमुळे लातूरसह संपूर्ण राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, मोटेगावकरचा दोन दिवसांपूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आरोपीने २१ जूनला सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना तयारी करा असं सांगितलं. इतकेच नाही तर ‘तुम्हाला ३६ हजार प्रश्नांची तयारी करुन घेतो. १७ तारखेपासून टेस्ट सिरीज सुरु होतेय’ असं मोटेगावकर याने सांगितलं आहे. यानंतर त्याचे अनेक नवे जूनमधील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पोलीस यंत्रणा सखोल तपास करत असून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Published on: May 18, 2026 03:44 PM
श्रेयस अय्यरला कर्णधार पद तर वैभव सुर्यवंशीची मोठी झेप, अनेक नवीन...
भाजपला सर्वात मोठा धक्का, अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर 15 पदाधिकारी
अजित पवारांच्या राष्ट्रावादीसाठी उमेदवार मागे घेतला? सुप्रिया सुळेंचं
आपण कुणाचे वारस आहोत, याचं स्मरण करा; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

