Mumbai Police : विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती! नवे आयुक्त नेमके कोण?
देवेन भारती सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. देवेन भारती मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत. फणसळकर यांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांच्याकडे मुंबईचं पोलीस आयुक्त पद गेलं आहे. आज सायंकाळी ते आपला पदभार स्वीकारतील.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या विवेक फणसळकर यांच्या निवृत्तीनंतर आता देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फणसळकर यांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांच्याकडे मुंबईचे पोलीस आयुक्त पद गेलेलं आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता देवेन भारती पदभार स्वीकारतील. देवेन भारती सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
कोण आहेत देवेन भारती?
देवेन भारती 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. देवेन भारती मुळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत. देवेन भारतींनी झारखंडमधून मॅट्रिक केलं. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. मुंबई डीसीपी झोन नाईन आणि डीसीपी गुन्हे शाखा म्हणून काम केलं. देवेन भारती यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलं. 2014 ते 2019 दरम्यान मुंबईतील प्रभावी पोलीस अधिकारी होते.
देवेन भारतींची नियुक्ती संयुक्त पोलीस आयुक्त म्हणून केली. त्यानंतर देवेन भारती यांना अतिरिक्त डीजीपी म्हणून बढती देण्यात आली. देवेन भारती दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख देखील होते. पत्रकार जे डी यांच्या हत्येच्या तपासात देवेन भारतींचा सहभाग होता. मुंबईतील 26/11 च्या तपासासह अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास केला. दहशतवादी कसाबला फाशी देण्याची जबाबदारी देवेन भारतींवर सोपवली होती.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं

