‘आपण देशाला पुन्हा काही वर्ष मागे नेतोय’, शरद पवार यांनी काय व्यक्त केली भीती
VIDEO | पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन सोहळ्यावर शरद पवार यांचा आक्षेप, काय व्यक्त केली चिंता?
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी साधु, संत-महंतांची हजेरी होती. मंत्रोच्चारात संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. यावेळी सर्व धर्मीयांची प्रार्थना सभाही झाली. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेप दर्शवत प्रतिक्रिया दिली आहे. ज्या लोकांची तिथं उपस्थित होती, जे काही धर्मकांड काम सुरू होती, ते पाहिल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताची जी संकल्पना मांडली होती, ते पाहता जे आता पार्लमेंटमध्ये चाललंय यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष पाठी नेतो की काय अशी चिंता वाटू लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. नेहरूंनी आधुनिक विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची भूमिका सतत मांडली. आज त्या ठिकाणी जे चाललं ते नेमकं उलटं चाललं आहे, असा आक्षेप शरद पवार यांनी नोंदवला.
Published on: May 28, 2023 04:29 PM
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
