Super Fast News | विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट फिफ्टीमध्ये
किसान मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत पार पडलेल्या कालच्या बैठकीत 40% मागण्या मान्य झाल्या असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं
मुंबई : विविध मागण्यांसाठी आलेल्या किसान सभेच्या लॉन्ग मार्चच्या मंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. ही बैठक दुपारी तीन वाजता होणार आहे. मात्र या बैठकीत योग्य तोडगा नाही निघाला तर मोर्चा सुरूच राहणार असल्याचा निर्धार माजी आमदार जीवा गावित यांनी केला आहे. दरम्यान किसान मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत पार पडलेल्या कालच्या बैठकीत 40% मागण्या मान्य झाल्या असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस असून मागिल दोन दिवसात यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. तोडगा निगाला नसल्याने सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत. मात्र संपामुळे सामान्य नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत. याचदरम्यान एक शिक्षक संघटना संपातून बाहेर पडल्यानंतर आज महाराष्ट्र राज्य महापालिका नगरपालिका त्याचबरोबर नगरपरिषद कर्मचारी संघटनेनं या संपातून माघार घेतली आहे. या संघचनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्यानंतर संघटनेने माघार घेतली. त्यामुळे संघटनेचे कर्मचारी कामावर परतनार आहेत. तर महाराष्ट्रामध्ये 17 मार्च पर्यंत गारपीटीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेडमध्ये पाऊस होण्याची शक्यता असून मुंबई आणि कोकण वगळता इतरत्र हलक्या पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे.
Published on: Mar 16, 2023 08:47 AM
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
