Pahalgam Attack Updates : पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर
पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याबाबत एनआयएकडून तपास केला जात आहे. या हल्ल्याच्या कटाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात एक मोठी माहिती समोर आली आहे. झाडांच्या मागून एक बाजूने दोन दहशतवादी आल्याचं तपासात समोर आलं आहे. बैसरन मधील हा हल्ला संपूर्ण रणनीती आखून करण्यात आलेला होता. गोळीबार सुरू होईल तेव्हा लोक घाबरून एंट्री आणि एक्झिट पॉइंटकडे पळतील याची दहशतवाद्यांना कल्पना होती. त्यामुळे दोन्ही दहशतवादी एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर उभे राहिले आणि एका क्षणात 7 जणांना मारल्याची माहिती एनआयएच्या तपासातून समोर आली आहे. त्यामुळे हा सर्व हल्ला पूर्वनियोजन करून आणि बैसरन खोऱ्याची रेकी करून करण्यात आलेला असल्याचं आता सिद्ध झालं आहे.
Published on: Apr 30, 2025 09:59 AM
Follow Us
Latest Videos
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
